कल्याण दि.12 मे :
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे प्राण वाचल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (The life of a female passenger was saved due to RPF personnel at Kalyan station)
मंगळवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एक महिला प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकावर विशाखापट्टणम एक्स्प्रेस पकडण्यासाठी आली होती. 4 नंबर प्लॅटफॉर्मवर आलेली एक्स्प्रेस सुरू झाल्याने या महिलेने घाई घाईत ही सुरू झालेली एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र याच गडबडीत तोल जाऊन ही महिला एक्स्प्रेस आणि फलाटाच्या गॅपमध्ये पडली. मात्र यावेळी ड्युटीवर तैनात आरपीएफ जवान ए. के. उपाध्याय यांनी हा प्रकार पाहिला आणि क्षणाचाही विलंब न लावता पुढे सरसावून महिलेला बाहेर खेचले. त्यामुळे महिलेचा जीव वाचू शकला , आरपीएफ जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.