टेक्नॉलॉजी आधारित शिक्षण देणारी पहिली शाळा
कल्याण दि.13 फेब्रुवारी :
कल्याण पश्चिमेतील नामांकित द केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आता कल्याण पूर्वेतही सुरू झाले आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केंब्रिया किड्स या इंटरनॅशनल प्रीस्कूलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. (The grand opening of Cambria Kids International Preschool in Kalyan East)
कल्याण पश्चिमेला असलेल्या केंब्रिया इंटरनॅशनल शाळेने आपल्या दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मात्र मर्यादित विद्यार्थी प्रवेश संख्येमुळे कल्याण पूर्वेतील अनेक पालकांना इच्छा असूनही आपल्या पाल्याला प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे अनेक पालकांनी कल्याण पूर्वेतही केंब्रीया शाळेची शाखा सुरू करण्याची आग्रही मागणी शाळा संचालकांकडे केली होती.
त्यानूसार आज कल्याण पूर्वेच्या मलंगगड मार्गावरील शंकर हाईट्स इमारतीमध्ये ही शाळा सुरू करण्यात आली. सुप्रसिद्ध व्यावसायिक भगवान शेठ भोईर, बांधकाम व्यावसायिक विष्णू गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या नव्या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्ले ग्रुप, डे केअर आदींसाठी ॲडमिशन प्रक्रियाही सुरू झाली असून कल्याण पूर्वेतील पालकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.
यावेळी पोटे ग्रुपचे सी एम डी बिपिन पोटे, संचालिका मीनल पोटे, बिझनेस हेड भूषण कुटे, केंब्रिया इंटरनॅशनलच्या मुख्याध्यापिका हिना फाळके यांच्यासह अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टेक्नॉलॉजी बेस एज्युकेशन देणारी पहिलीच शाळा…
पोटे ग्रुप हा गेल्या 23 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. तर गेली 11 वर्षे कल्याण पश्चिममध्ये केंब्रिया इंटरनॅशनल शाळेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहोत. कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या मागणी होती की आम्हाला कल्याण पश्चिमेच्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेत आम्ही केंब्रिया प्री स्कूलच्या माध्यमातून सुरुवात करतोय. आणि आम्हाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची भावना पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केली.
केंब्रिया किड्स शाळेची ही आहेत प्रमुख वैशिष्ट्ये…
पूर्णपणे टेक्नॉलॉजी बेस एज्युकेशन,
वैयक्तिक लक्ष हा अनेक वर्षांचा प्रमूख भाग,
विविध माध्यमांतून लहान मुलांना शिकवण्याचे काम,
डिजिटल माध्यमातून शिक्षणाची सुविधा.
*अधिक माहिती – प्रवेशासाठी संपर्क :*
केंब्रिया किड्स, शंकर हाईट्स, साकेत वर्ल्डसमोर, मलंगगड रोड, कल्याण पूर्व
8298-37-8853