Home ठळक बातम्या अतिरेकी हल्ला हा देशावरील आघात, केंद्र सरकार बदला घेतल्याशिवाय राहणार नाही –...

अतिरेकी हल्ला हा देशावरील आघात, केंद्र सरकार बदला घेतल्याशिवाय राहणार नाही – वनमंत्री गणेश नाईक

अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिघा डोंबिवलीकरांच्या कुटुंबियांची घेतली भेट

डोंबिवली दि. 25 एप्रिल :
पहलगाम येथील अतिरेकी हल्ला हा देशावर झालेला आघात असून देशाच्या नेतृत्वामध्ये एअर फोर्स, नेव्ही, मिलिटरी या सर्व यंत्रणा सतर्क आहेत. त्यामूळे निश्चितपणे याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांमध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवलीत आपल्या भावना व्यक्त केल्या. (Terrorist attack is a blow to the country, the central government will not remain without taking revenge – Forest Minister Ganesh Naik)

दोन दिवसांपूर्वी काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या संजय लेले, हेमंत नाईक, अतुल मोने या तिघा पर्यटकांचाही मृत्यू झाला. या तिघांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी वनमंत्री गणेश नाईक आज डोंबिवलीत आले होते.

अतिरेकी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारने तातडीने पाऊले उचलायला सुरुवात केली असून पाकिस्तानच्या नागरिकांना तुम्ही देश सोडून जाण्यास सांगितले आहे. आणि आपल्या देशातले जे नागरिक पाकिस्तानमध्ये कामानिमित्त गेलेले आहेत त्यांनाही देशात परत येण्यास सांगण्यात आले आहे. निश्चितपणे देशाच्या नेतृत्वामध्ये आणि संपूर्ण एअर फोर्स, नेव्ही, मिलिटरी या सर्व यंत्रणा सतर्क असून निश्चितपणे या हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय येथील जनता राहणार नाही अशा शब्दांत त्यांनी हल्ल्याविरोधातील कृतीची पुढची दिशा स्पष्ट केली.

अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबावर आघात तर झालाच आहे. परंतु हा देशावर झालेला आघात असून निश्चितपणे अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाचे नेतृत्व कठोर शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी देशातल्या सर्व जनतेच्या भावना एकवटल्याचे वनमंत्री नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर व्यक्तिगत जीवनामध्ये सहानुभूती आम्ही दाखवू शकतो, परंतु गेलेला जीव तर परत आपण आणू शकत नाही. परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोभ देशामध्ये उसळलेला आहे एकूणच जे वातावरण झाले आहे देशांमध्ये निश्चितपणे भविष्य काळामध्ये अशा दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवला जाईल.

आपल्या देशातले नागरिक मृत्युमुखी पडले असून त्यांना अमानुषपणे त्यांना मारण्यात आले आहे. ज्या निर्दोष लोकांची हत्या झाली याचा निषेध केलाच पाहिजे. आणि सर्व देश या भावनेच्या पाठीमागे एकवटला पाहिजे असेही गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा