Home कोरोना टिम वर्क हेच कोविड कालावधीतील केडीएमसीच्या यशाचं गमक – महापालिका आयुक्त डॉ....

टिम वर्क हेच कोविड कालावधीतील केडीएमसीच्या यशाचं गमक – महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

 

कल्याण – डोंबिवली दि.2 ऑक्टोबर :
Colabarative Efforts‍ (टिम वर्क) हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक असल्याचे उद्गार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त सावित्रीबाई फुले कलामंदिरात‍ महापालिका सचिव संजय जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले. या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या कारर्किदीतील वेगवेगळया घडामोडींची माहिती दिलखुलासपणे प्रेक्षकांसमोर मांडली.

कोवीडच्या लढाईने एक वेगळीच उर्जा सगळयांना दिली. ती वापरुन नागरिकांचे प्रश्न सोडवू या, नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा वचनबध्द होऊ या असे आवाहनही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कोविड काळात महापालिकेला मदत केलेल्या /करणा-या डॉक्टर्स आर्मीतील कल्याण आयएमएचे डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह निमा, धारपा, केम्पा या वैद्यकीय संघटनांतील अध्यक्षांचा, बाज आर आर रुग्णालयाचे डॉ. अमिर कुरेशी, निऑन रुग्णालयातील मिलींद शिंदे, हॉलिक्रॉस हॉस्पिटलच्या सिस्टर शिबा यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेला कोविड कालावधीत मदत करणा-या विविध एनजीओ, कोविडच्या पहिल्या लाटेत अन्नधान्य पुरवठा करणा-या दानशुर व्यक्ती, गुरुद्वारा, कल्याण पश्चिम, संत गजानन सेवा ट्रस्ट या सारख्या सेवाभावी संस्थानाही यावेळी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोविड कालावधीत महापालिकेस सातत्याने सहकार्य करणा-या पोलिस अधिकारी/कर्मचारी वर्गाचा, महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये सेवा देणा-या व्यक्तींचाही महापालिका आयुक्त यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी,कर्मचारी वर्गाचा तसेच विविध पत्रकार संघटनांचा देखील प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

या समारोहास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टर्स, एनजीओज, अप्पर पोलिस आयुक्त दत्‍तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिकेचा अधिकारी वर्गही कार्यक्रमाला उपस्थित होते.

तर महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त विनय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सुमधुर आवाजात गाणी गाऊन तर कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी आपल्या एकपात्री अभिनयाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव संजय जाधव यांच्यासह दत्तात्रय लदवा, महेश देशपांडे यांनी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा