…तर कल्याण डोंबिवलीत लॉकडाउनची गरज नाही – डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण दि.19 फेब्रुवारी :
गेल्या 2-3 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. एकीकडे कोवीडचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असतानाच आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भाजी मार्केट आणि विविध दुकानांमध्ये सरप्राईज व्हिजिट दिल्याने दुकानदार गडबडून गेले. बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी मास्क घातला नसल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आले.
काही दिवसांपूर्वी 70 च्या आत असणारे कोरोना रुग्ण कल्याण डोंबिवलीतील गेल्या 2 दिवसांपासून 100री ओलांडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनही आणखीन सतर्क झाले असून कोवीड नियम पाळण्याबाबत नागरिकांना सतत आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही काही बेजबाबदार नागरिक मास्क वापरण्याबाबत उदासीन असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या या अचानक भेटीत आढळून आले.
हॉलमधील समारंभांना गर्दी झाल्यास गुन्हे दाखल करणार…
त्याचबरोबर लग्न हॉल, बँकवेट हॉलमध्ये साजऱ्या होणाऱ्या समारंभांवरही महापालिका प्रशासन करडी नजर ठेवली असून निर्बंधांपेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना दिली.
तर लॉकडाऊनची गरज नाही…
कोवीडविरोधातील त्रिसूत्री सर्व नागरिकांनी व्यवस्थित पाळली पाहीजे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स आणि हात धुणे या त्रिसूत्रीचा नागरिकांनी वापर केल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी आणि दुकानदार, आस्थापना यांनी आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Modafinil is a powerful stimulant that offers insane cognitive benefits like [ 2 ]:. Maybe you want to understand why people from all around the world are chomping at the bit to get their hands on Modafinil. levitra malaysia According to one study from the University of Oxford in England [ 5 ]:.
Dr. Vijay Survanshi is doing a good job by giving surprise visit to shops & market for checking compliance of COVID guidelines / protocols. Similar surprise visit should be done to schools.
Heard that a school in Dombivli is not following COVID guidelines laid down by government. They are not doing thermal screening of students and teachers are not wearing masks while teaching.
It is a big risk.