Home ठळक बातम्या सुलभा गणपत गायकवाड या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होणार – मंत्री रविंद्र चव्हाण...

सुलभा गणपत गायकवाड या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होणार – मंत्री रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

कल्याण दि.24 ऑक्टोबर:
आमदार गणपत गायकवाड यांच्याप्रति येथील जनतेचा असलेला विश्वास आणि सुलभा गायकवाड यांनी वाढवलेला जनसंपर्क यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून सुलभा गणपत गायकवाड या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतीत असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. सुलभा गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी प्रभाग ड कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. (Sulabha Ganpat Gaikwad will win with a huge margin – Minister Ravindra Chavan believes)

राज्यातील महायुतीच्या माध्यमातून १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी प्रभाग ड कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तिसाई हाऊस ते प्रभाग ड कार्यालय या दरम्यान युतीच्या अनेक गणमान्य नेत्यांच्या उपस्थितीत भव्य अशी शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, भाजपा नेते विनोद तावडे, आमदार कुमार आयलानी, दलीत मित्र अण्णा रोकडे , कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांचेसह सुमारे महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोठ्या उत्साही वातावरणात आणि ढोल ताशा , डिजे , चित्र रथ , त्याचबरोबर विविध जाती धर्मातील तालवाद्यांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत आमदार गणपत गायकवाड यांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की गेली अनेक दशके या मतदारसंघात सेना भाजपाची युती आहे,आमदार गणपत गायकवाड यांचा प्रचंड असा जनसंपर्क आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुलभा गायकवाड या ही निवडणूक लढत असल्याने त्यांचा विजय नक्की आहे.

यावेळी कोळसेवाडी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा