Home ठळक बातम्या निमा वेद ग्लॅम 2024 आणि आनंदी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे कल्याणात यशस्वी आयोजन

निमा वेद ग्लॅम 2024 आणि आनंदी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे कल्याणात यशस्वी आयोजन

कल्याण दि.3 ऑक्टोबर :

कल्याणमध्ये वूमेन्स फोरम निमा कल्याण यांच्यातर्फे ‘निमा वेदा ग्लॅम 2024’ Brain & Beauty contest ही महिला डॉक्टरांची सौंदर्य स्पर्धा आणि “आनंदी” ही राष्ट्रीय वैद्यकिय शिक्षण परिषद अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली. भारतीय चिकित्सा पद्धती (आयएसएम) च्या पद‌वीधरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या निमा – नॅशनत इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशनच्या कल्याण शाखा तसेच निमा वुमेन्स फोरमने या सौंदर्य स्पर्धा आणि राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले. (successful organization of
Nima Veda Glam 2024 and Anandi National Medical Council in Kalyan)

सौंदर्य स्पर्धेत उत्तराखंड ते कर्नाटकमधील महिला डॉक्टर…
कल्याणात प्रथमच झालेल्या या महिला डॉक्टरांच्या सौंदर्य स्पर्धेमध्ये देशाच्या उत्तराखंड ते कर्नाटक अशा विविध राज्यांतील 35 महिला डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले. विविध पेहराव, आभुषणे, कॅटवॉक, कलागुण सादरीकरण, सामाजिक बांधिलकीत स्वतःची ओळख आणि बौद्धिक क्षमतेचा कस लावणारे विविध प्रश्न अशा विभिन्न फेऱ्यानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली.
रॉयल ग्रुपमध्ये मिरा-भाईंदरची डॉ. अपूर्वा रंगारी विजेती तर जबलपुरची डॉ. तलन फिरदौस उपविजेती ठरली. क्लासिक ग्रुपमध्ये हरयाणाच्या डॉ. रश्मि शर्मा विजेत्या ठरल्या तर कल्याणच्या डॉ.आम्रपाली परांजपे आणि व सोलापूरच्या डॉ. सारिका होमकर या दोघीही अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेत्या ठरल्या. या स्पर्धेसाठी वुमेन्स फोरमच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. साधना कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथी आणि डॉ. वैशाली पडघन या अध्यक्षपद भूषविले.


“आनंदी” राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला देशभरातील 500 डॉक्टरांची उपस्थिती…

तर या सौंदर्य स्पर्धेनंतर झालेल्या एकदिवसीय “आनंदी” ही राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण परिषद कल्याणात संपन्न झाली. ज्याला देशाच्या विविध राज्यातील 500 हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. वैद्यकीय क्षेत्रातील नवनविन संशोधन, कायदे, लसीकरण, चिकित्सा कौशल्य आदी प्रमुख विषयांवर या परिषदेत तज्ज्ञांकडून उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात आले. तर याच वैद्यकीय परिषदेमध्ये वैद्यकीय सेवा, शिक्षण, संघटन आणि मार्गदर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन महिला डॉक्टरांना पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष शांतीलाल शर्मा, समन्वयक डॉ. पडघन, महाराष्ट्र निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुर्यवंशी, कोषाध्यक्ष डॉ. सोपान खर्चे, डॉ. रोहिणी वाळुंजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते आनंदी मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले.

हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदा ग्लॅम आयोजन अध्यक्ष डॉ. अमिता कुकडे, आयोजन सचिव डॉ. प्राजक्ता ठाकूर, समन्वयक डॉ. मोनिका पाटील, आनंदी परिषदेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना जगदाळे, सचिव डॉ. रोहिणी वाळुंजकर, डॉ. सोनाली फोंडगे, डॉ. स्वाती काळे, यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. शाम पोटदुखे, डॉ. राजेश दहापुते, डॉ. अभिजीत ठाकूर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा