कल्याण दि.13 जून :
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर अवघड अशी मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून कल्याणातील जी प्लस हार्ट रुग्णालयाने आणखी एका रुग्णाचा जीव वाचवला आहे. त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाइकांसह इतरांकडूनही जी प्लस हार्ट रूग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. (Successful craniotomy on seriously injured youth in Kalyan’s G Plus Heart Hospital; The young man’s life was spared)
रस्ते अपघातात झाली गंभीर दुखापत…
जी प्लस हार्ट रूग्णालयात 23 मे रोजी रात्री रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेला एक युवक गंभीर अवस्थेत दाखल झाला होता. रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीच करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यामध्ये त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन गाठ झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जी प्लस रूग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आला. मात्र हा युवक व्यवस्थितपणे शुद्धीत असल्याने त्याच्या नातेवाईकांनी सुरुवातीला या शस्त्रक्रियेला नकार दिला. मात्र त्यानंतर काही मिनिटातच या युवकाला अत्यवस्थ वाटू लागले आणि त्याची शुध्द हरपली.
या टीमने केली ही अवघड शस्त्रक्रिया…
परिणामी जी प्लस हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवले आणि त्याठिकाणी नामंकित न्युरोसर्जन डॉ. दिलराज कडलस यांच्याकडून त्याच्यावर क्रेनाटॉमी म्हणजेच मेंदूत रक्तस्त्रावामुळे झालेली गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ज्यामुळे या युवकाचे प्राण वाचू शकले. डॉ. कडलस यांना ही शस्त्रक्रिया करण्यासाठी समता गुरव सिस्टर, डॉ. साई प्रसाद कुरुंटूकर, प्रथेमश चेंबुरकर, सोनाली वरनेरकर या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. त्याबद्दल जी प्लस हार्ट रुग्णालयाचे प्रमुख कॉर्डिओलॉजीस्ट डॉ. अमोल जी. चव्हाण, संचालक विजय डी. राठोड, व्यवस्थापक डॉ.अजय सोनवणे यांनी या संपूर्ण टीमचा सत्कार केला. तर आपल्या युवकाचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या पालकांनीही जी प्लस हार्ट रुग्णालय आणि सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार मानले आहेत.
गेल्या महिन्यात झाल्यात अनेक यशस्वी शस्त्रक्रिया…
कल्याणातील जी प्लस हार्ट रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यात अनेक अवघड शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीपणे करण्यात आल्या असून त्याद्वारे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात इथल्या डॉक्टरांना यश आले आहे. या यादीमध्ये आता आणखी एका यशस्वी शस्त्रक्रियेची आणि या रुग्णाचीही भर पडली आहे. त्याबद्दल सर्वच स्तरातून जी प्लस हार्ट रूग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले जात आहे.