Home कोरोना कल्याण डोंबिवलीतील कोवीड रुग्णसंख्या कमी झाली नाही तर…महापालिका आयुक्तांनी दिला इशारा

कल्याण डोंबिवलीतील कोवीड रुग्णसंख्या कमी झाली नाही तर…महापालिका आयुक्तांनी दिला इशारा

 

कल्याण दि. 9 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या (increasing covid patients in kdmc) महापालिका प्रशासन आणखीनच सतर्क झालं आहे. येत्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी न झाल्यास कठोर निर्णय घेण्याचा इशारा (strict-decision-if-covid-patient-figures-is-not-reduced-kdmc-commissioners-warning) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (kdmc commissioner)यांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रोजच्या आकड्यांनी गेल्या 3 आठवड्यात 80 वरून आता सुमारे पावणे तीनशेचा आकडा गाठला आहे. या पार्श्वभूमीवर टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर (covid testing and contact tracing) भर देण्याबरोबरच ज्या बिल्डींगमध्ये कोवीड रुग्ण आढळून येतील. त्या बिल्डिंगमधील सर्व नागिरकांचे टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. नागरिकांनी टेस्टिंगला विरोध न करता टेस्टिंगला येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. येत्या काळात कठोर पाऊले उचलावे लागतील, कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेलं. तसेच सध्या ज्या कोवीड केसेस वाढत आहेत त्या लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमूळे केसेस (Marriage and parties are responsible for rise in covid patients in kdmc) वाढत असून यावर आता अत्यंत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा