कल्याण डोंबिवली दि.13 मे :
आज दुपारी अचानक झालेल्या वादळी वारे आणि पावसाच्या तडाख्यात मध्य रेल्वेची वाहतूक पार कोलमडून पडली. आणि नेहमीप्रमाणे त्याचा फटका लाखो प्रवशांना बसला. मुंबईपासून घाटकोपर, कुर्ला, ठाणे , डोंबिवली आणि कल्याण या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. (stormy winds and rain; Megahaul of passengers on Central Railway, huge rush at railway stations)
कल्याण डोंबिवलीसह ठाणे, मुंबई परिसरात आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. साधारणपणे अर्धा तासच झालेल्या या पावसाने मध्य रेल्वेचे पार कंबरडे मोडले. अवकाळी पावसामुळे लोकल वाहतूक उशिराने धावत असल्याचा कामावरून घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसल्याचे दिसून आले.
वादळी वाऱ्यामुळे लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आणि मुंबईसोबतच घाटकोपर, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर संध्याकाळपासून प्रचंड गर्दी झाली होती. तर ज्या काही लोकल धावत होत्या त्या विलंबाने धावत असल्याने त्याही प्रवशांनी खचाखच भरून होत्या.
कल्याण स्टेशनवर तर इतकी गर्दी होती की मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म आणि मोठ्या पादचारी पुलावरही प्रवाशांची गर्दी उसळली होती.