Home ठळक बातम्या युवासेनेचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरे गटात ; मातोश्री येथे...

युवासेनेचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरे गटात ; मातोश्री येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई दि.6 ऑक्टोबर :
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे डोंबिवलीतील युवानेते दिपेश म्हात्रे यांनी आज मातोश्री येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून दिपेश म्हात्रे ठाकरे गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर म्हात्रे यांनी उध्दव ठाकरे यांच्या प्रमूख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करत अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले.(State secretary of Yuva Sena Dipesh Mhatre in Uddhav Thackeray group; Party entry in the presence of Uddhav Thackeray at Matoshree)

डोंबिवली विधानसभेच्या उमेदवारीवरून एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याचे संकेत दिपेश म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर दिपेश म्हात्रे यांनी केलेला हा पक्ष प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची याबाबत काय भूमिका असणार यावर पुढची गणिते अवलंबून असणार आहे. तर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेल्या या पक्ष सोडण्याच्या निर्णयावरूनही वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

त्यांच्या जाण्याने पक्षाचे काहीही नुकसान होणार नाही – आमदार विश्वनाथ भोईर
ते पक्षाचे एक वजनदार नेते होते, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. परंतु कोणीही जाण्याने कोणाचेही नुकसान होत नाही अशी प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. व्यक्तीमुळे एखादा पक्ष नसतो तर पक्षामुळे व्यक्तीचे अस्तित्व असते. एखादी व्यक्ती निघून गेल्यावर दुसरी व्यक्ती त्याची जागा घेते. शिवसेना ही संघटनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असून आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते त्याचे पाईक आहोत. परिणामी एक व्यक्ती गेल्याने पक्षाचे काहीही नुकसान होत नसल्याचेही आमदार भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा