Home ठळक बातम्या महाराष्ट्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन आणि रिसर्च सेंटर सुरु करा –...

महाराष्ट्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन आणि रिसर्च सेंटर सुरु करा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची केंद्राकडे मागणी

 

नवी दिल्ली दि. 8 डिसेंबर :
महाराष्ट्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन आणि रिसर्च सेंटर सुरु करण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केली. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडण्यात आलेल्या राष्ट्रीय फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन सुधारणा विधेयक २०२१ वरील चर्चेत बोलताना खासदार डॉ. शिंदे यांनी ही मागणी केली. तसेच या विधेयकाचे समर्थन करताना त्यातील दोष आणि धोरणातील त्रृटींकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तर या विधेयकायावरील चर्चेदरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉ. शिंदे यांनी केलेल्या मागण्यांवर नक्कीच विचार करू असे आश्वासित केले.

कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेतील संक्रमण रोखताना आपल्या देशातील आरोग्य क्षेत्रातील कमतरता प्रकर्षणाने जाणवल्या असून भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरिता मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि नाविन्यपूर्ण बदल करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. तर केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेसंदर्भात हरकतीचा_मुद्दा मांडत प्रख्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि व्यावसायिक यांची कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करताना निवडीसंदर्भातील निकषांचा उल्लेख नसल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यासोबत आयुषमंत्रालय तसेच सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि न्युक्लियर मेडिसिन्स या संस्थांचे प्रतिनिधी देखील या मंडळावर असणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तर देशातील औषध निर्मितीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या घटकांसाठी आपल्याला चीनवर अवलंबून रहावे लागत असून यापैकी ६७ टक्के माल हा चीनमधून आयात करावा लागतो. ही गंभीर बाब असून भविष्यात याचे गंभीर परिणाम देशातील औषध निर्मितीवर होऊ शकतात. हे जाणून घेत केंद्र सरकारने औषध निर्मितीसाठी लागणारे घटक देशातच विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरजही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे औषध निर्मितीला प्रोत्साहन देण्याकरिता रायगड येथे ५००० एकर एवढ्या मोठ्या जागेवर फार्मा पार्क उभारण्यात येणार असल्याचे २०२० जाहीर केले आहे. या फार्मा पार्कमध्ये औषध निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारनेदेखील यात सहकार्य करावे अशी आग्रही मागणी करत महाराष्ट्रातही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर सुरु करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा