
कल्याण दि.15 जून :
कल्याण -शिळ मार्गावर एसटीने जेसीबीला धडक दिल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.
एसटी महामंडळाची ही बस पनवेलहून कल्याण -शिळ मार्गे कल्याणच्या दिशेने येत होती. त्यावेळी अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मध्ये उभ्या असणाऱ्या जेसीबीला धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला की आणखी इतर कारणामुळे याची निश्चित माहिती मात्र मिळू शकली नाही.