Home ठळक बातम्या चिमुरड्यांच्या मनातील गणपती बाप्पा; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिमुरड्यांच्या मनातील गणपती बाप्पा; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि.16 सप्टेंबर :
कल्याणात आयोजित चित्रकला आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३७५ हून अधिक मुला-मुलींनी स्पर्धेत भाग घेत त्यांच्या मनातील गणपती बाप्पा कागदावर रेखाटला. भाजप शहराध्यक्ष आणि कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांच्याकडून ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.(spontaneous-response-to-the-painting-competition-of-the-kalyan-city-sarvjanik-ganeshotsav-mahamandal)

कल्याण पश्चिमेच्या मंगेशी हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेला शहराच्या विविध भागातील मुलांची उपस्थिती होती. बालगणेश, मी अँड माय फ्रेंड, गणपती बाप्पाची आगमन – विसर्जन मिरवणूक आदींबरोबरच पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, वाहतुकीचे नियम पाळा किंवा रोड सेफ्टी विषय आदी विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये छोट्या मुलांसाठी गणपती हा विषय देण्यात आला होता. या चिमुरड्यांनी आपल्या मनातील लाडक्या गणपती बाप्पा अत्यंत आनंदाने आणि त्यात रममाण होऊन रेखाटल्याचे पाहायला मिळाले. तर मोठ्या गटातील मुलांनीही पर्यावरण आणि वाहतूक कोंडीचे उपाय सुचविणारी सुरेख चित्रे, पोस्टर्स रेखाटली.

ही चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांच्याबरोबरच महामंडळाचे संस्थापक राजा सावंत, विजय कडव, किरण गायकवाड, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माजी अध्यक्षा कांचन कुलकर्णी, सागर भालेकर यांनी मेहनत घेतली.

या स्पर्धेला शाळेमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (आरएसपी) रस्ते सुरक्षेचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या युनिटचे अधिकारी दिलीप स्वामी, विभागीय आरएसपी कमांडर डॉ. मणिलाल शिंपी, विनोद शेलकर, उमाकांत चौधरी, मंगेश बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी मंगेश भामरे, केशव मालुंजकर, आर. आर. भोकनळ, सचिन मालपुरे, संजय खैरनार, भगवान माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. तर परीक्षक म्हणून अश्विनी मिस्त्री, भगवान माळी, मंगेश भामरे यांनी काम पाहिले. मॉडेल कॉलेजचे संचालक सुभाष गायकवाड, कु. श्रुती गमरे, कोमल केसुरे यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य केले. या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती वरुण पाटील यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा