कल्याण दि. 2 मे :
सध्या भासणारा रक्ताचा तुटवडा पाहता कच्छ युवक संघ, विकासा आणि माहेश्वरी युवा संस्थेतर्फे 1 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तब्बल 95 रक्तदात्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सध्या पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोवीड लस देण्यासही सुरुवात झाली. याच वयोगटातील बहुतांश व्यक्ती या मोठ्या प्रमाणात रक्तदान करत असतात. परंतु कोवीड लस घेतल्यानंतर 1 ते 2 महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोवीड लस घेण्यापूर्वी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन या सामाजिक संस्थांनी केले होते. त्या अनुषंगाने कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये 95 रक्तदात्यांनी सहभाग घेतल्याची माहिती दिनेश ठक्कर यांनी दिली. कोवीडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स आणि इतर सर्व नियम पाळून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
Home कोरोना कच्छ युवक संघ, विकासा आणि माहेश्वरी युवा संस्थेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद