
कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजन
कल्याण दि.6 एप्रिल :
कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त शेणाळे तलाव परिसरात आयोजित प्रभू श्रीरामांच्या महाआरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, कल्याण संस्कृती मंच आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याणात तीन ठिकाणी या महाआरती घेण्यात आल्या.
कल्याणच्या ऐतिहासिक शेणाळे तलाव परिसर आज ढोल ताशांच्या गजरासह प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने निनादून गेला. सुरुवातील पांचजन्य ढोल ताशा पथकाकडून लयबद्ध वादन त्यानंतर मारुतीस्तोत्र, श्रीरामरक्षा पठण करून मग श्रीगणेश आणि श्रीरामांची आरती भक्तीभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभेचे भाजप उमेदवार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, स्वागतयात्रा समनव्यक डॉ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, कल्याण संस्कृती मंचचे ॲड. निशिकांत बुधकर यांच्यासह कल्याणातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यावसायिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.