कल्याण दि.31 जानेवारी :
शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळांबद्दल आणि व्यायामाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनतर्फे आयोजित या क्रिडा स्पर्धांना दोन दिवसांपूर्वीपासून सुरुवात झाली आहे. या पहिल्या वहिल्या ठाणे जिल्हा क्रिडा महोत्सवाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजक आणि ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनचे अंकुर आहेर यांनी दिली.
30 जानेवारी रोजी झालेल्या स्पर्धांचे अंतिम निकाल..
*बुद्धिबळ स्पर्धा*
अंतिम निकाल
स्थळ – अभिनव विद्यामंदिर, कल्याण पश्चिम
मुले (१७ वर्षाखालील)
प्रथम – श्रवण पार्टे, के.सी.गांधी विद्यालय, कल्याण
द्वितीय – चिन्मय अय्यर, चंद्रकांत पाटकर विद्यालय इंग्रजी, डोंबिवली
तृतीय – शशांक कुलकर्णी, श्री विद्या शाळा, कल्याण
उत्तेजनार्थ – तन्मय शिंपी, माॅडेल काॅलेज,
उत्तेजनार्थ – समर्थ निजापकर, राॅयल ज्युनियर कॉलेज
मुली (१७ वर्षाखालील)
प्रथम – काव्या ठाकूर, होली एंजल्स, डोंबिवली
द्वितीय – अश्मी मोरणकर, चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली
तृतीय – परिणिता कामत, चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली
उत्तेजनार्थ – आर्या सुर्वे, श्री वाणी विद्यालय, कल्याण
उत्तेजनार्थ – चिन्मयी खेडेकर, चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली
*कबड्डी स्पर्धा*
अंतिम निकाल
स्थळ – दादासाहेब गायकवाड क्रीडांगण, कल्याण पूर्व
मुले (१७ वर्षाखालील)
प्रथम – एस.एस.टी. काॅलेज, उल्हासनगर
द्वितीय – स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, कल्याण पूर्व
तृतीय – माॅडेल काॅलेज, कल्याण पूर्व
उत्कृष्ट चढाई – शुभम चव्हाण, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, कल्याण पूर्व
उत्कृष्ट पकड- शुभम पाटील, एस.एस.टी, उल्हासनगर
सर्वोत्कृष्ट खेळाडू – श्रावण तांबे, एस.एस.टी. काॅलेज, उल्हासनगर
मुली (१७ वर्षाखालील)
प्रथम – आटगांव विद्यामंदिर, कोनगांव, भिवंडी
द्वितीय – माॅडेल काॅलेज, कल्याण पूर्व
तृतीय – स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, कल्याण पूर्व
उत्कृष्ट चढाई – अदिती पोमण, माॅडेल काॅलेज, कल्याण पूर्व
उत्कृष्ट पकड – सायली भोपे, आटगांव विद्यामंदिर, कोनगांव, भिवंडी
सर्वोत्कृष्ट खेळाडू – श्रद्धा आवटी, आटगांव विद्यामंदिर कोनगांव भिवंडी
*टेनिस बॉल क्रिकेट*
अंतिम निकाल
स्थळ – भागशाळा मैदान, डोंबिवली पश्चिम
मुले (१७ वर्षाखालील)
प्रथम – कॅप्टन ओक हायस्कूल, कल्याण पश्चिम
द्वितीय – डाॅन बाॅस्को हायस्कूल, कल्याण पश्चिम
तृतीय – इरा ग्लोबल, काटई, डोंबिवली
उत्कृष्ट फलंदाज – प्रियांशू पाटील, कॅप्टन ओक हायस्कूल, कल्याण
उत्कृष्ट गोलंदाज – साई विनोद, इरा ग्लोबल, डोंबिवली
अष्टपैलू खेळाडू – आदित्य राजपूत, डाॅन बाॅस्को स्कूल, कल्याण
मुली (१७ वर्षाखालील)
प्रथम – प्रगती काॅलेज, डोंबिवली पूर्व
द्वितीय – चंद्रकांत पाटकर इंग्रजी, डोंबिवली
तृतीय – साजेशी मोनजी स्कूल, डोंबिवली
उत्कृष्ट फलंदाज – योगिता पाटील, प्रगती काॅलेज, डोंबिवली
उत्कृष्ट गोलंदाज – शरायू पाटील, चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली
अष्टपैलू खेळाडू – प्रिती घाडीगांवकर, प्रगती काॅलेज, डोंबिवली
जिल्हा क्रीडा महोत्सवात या खेळांच्या स्पर्धा…
जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा आटयापाट्या संघटनेतर्फे आयोजित क्रिडा महोत्सवात बैठ्या खेळापासून ते मैदानी खेळापर्यंत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 29 आणि 30 जानेवारी रोजी शालेय प्रो कबड्डी, बुद्धीबळ, टेनिस बॉल क्रिकेट, लंगडी, 31जानेवारी रोजी खो खो, टेनीक्वाईट , तलवारबाजी, कॅरम, आर्चरी आणि 4 फेब्रुवारी रोजी आटयापाट्या खेळाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.