Home ठळक बातम्या डोंबिवली मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला येणार वेग; निविदा झाली प्रसिद्ध

डोंबिवली मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला येणार वेग; निविदा झाली प्रसिद्ध

 

डोंबिवली दि.14 ऑगस्ट :
डोंबिवली पश्चिमेतील मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केडीएमसी प्रशासनाकडून याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती याप्रश्नी पाठपुरावा करणाऱ्या युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

अनेक वर्षांपासुन अस्तित्वात असलेले हे डोंबिवली पश्चिमेतील मच्छी मार्केटची अत्यंत दुरावस्था झाली होती. या मार्केटची दुरावस्था लक्षात घेता दिपेश म्हात्रे यांनी काही वर्षांपूर्वी या मार्केटच्या पुनर्बांधणीची मागणीही केली होती. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्दशनासही ही बाब आणून दिल्याचे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

या मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणीचे काम बरेच दिवस रखडले होते. याचा पाठपुरावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंसह केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आला होता. तसेच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत मच्छी मार्केट परिसराची पाहणीही केली होती. या पाठपुराव्याला आता यश आले असून मच्छी मार्केटच्या पुनर्बांधणी कामाची केडीएमसीकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच या मच्छी मार्केटच्या कामाला वेग येईल अशी प्रतिक्रिया युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा