मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीनंतर विशेष गाड्यांची व्यवस्था
डोंबिवली दि.२५ ऑगस्ट :
गणेशोत्सवासाठी दिवा स्थानकावरून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. त्याला मध्य रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत दिवा स्थानकातून कोकणात विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील दिवा,कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय वास्तव्याला आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. या भाविकांसाठी दिवा स्थानकातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
त्यानूसार रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी दिवा रोहा चिपळूणपर्यंत एक गाडी वाढवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीनुसार या ट्रेनमध्ये दिवा विभागासाठी चार जनरल डबे आरक्षित करण्यात आले आहेत. याशिवाय सावंतवाडी – दिवा – सावंतवाडी अशी रोजची सेवा सुरू आहे. तर ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा स्टेशनवरून सकाळी ६:२५ वाजता सुटणार असून ती सावंतवाडी येथे १८:३० वाजता पोहचणार आहे. तर या विशेष गाडीचा परतीची वेळ सावंतवाडी येथून २०:१० वाजताची असून ती दिवा येथे ०८:२५ आगमन होणार आहे.
गणेशोत्सवासाठी गाड्यांचे असे आहे नियोजन…
गणपती उत्सवासाठी गाडी क्रमांक ६१०११ दिवा रोहा चिपळूणपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दिवा स्थानकातून सकाळी ९:१० वाजता सुटणार
रोहा आगमन ११:००
रोहा ११:०५
चिपळूण १३:२०
तर परतीच्या प्रवासात चिपळूणहून दुपारी १३:२५ ही गाडी सुटणार असून रोहा आगमन १६:१० वाजता आणि दिवा स्थानकात संध्याकाळी १८:४५ वाजता येईल.
याशिवाय २५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी क्रमांक ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. तसेच आमदार पाटील यांच्या मागणीनुसार या ट्रेनमध्ये ४ GS (जनरल) डबे दिवा स्थानकातील प्रवाशांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
याशिवाय सावंतवाडीसाठी दिवा ते सावंतवाडी अशी रोजची सेवा चालवली जात आहे.
ट्रेन क्र. १०१०५ दिवा सकाळी ६:२५ ची सावंतवाडीला १८:३०
परतीचा प्रवास सावंतवाडी २०:१० वाजता आणि दिवा आगमन ०८:२५ वा.