Home ठळक बातम्या ..म्हणून कल्याणातील शिक्षणतज्ञ करणार नाशिकच्या साहित्य संमेलनात ‘आत्मक्लेश उपोषण’

..म्हणून कल्याणातील शिक्षणतज्ञ करणार नाशिकच्या साहित्य संमेलनात ‘आत्मक्लेश उपोषण’

 

कोरोना काळात शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याविरोधात नाराजी

कल्याण दि.3 डिसेंबर :
कल्याणात राहणाऱ्या शिक्षणतज्ञाने राज्य सरकारच्या निषेधार्थ आजपासून नाशकात सुरू झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये आत्मक्लेश उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्र गौरीकुमार बैसाणे असे या शिक्षण तज्ञाचे नाव असून ते गेल्या 20 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात भारूकाका नावाने परिचित आहे.

महेंद्र बैसाणे हे आकाशवाणी-दूरदर्शनमधील वर्ग-२ ची नोकरी सोडून ‘विद्यार्थी आत्महत्या, करिअर कौन्सिलिंग’ या विषयांमध्ये कार्यरत आहेत. तर करोना काळात आपण अनेक व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यथा शालेय शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग, उद्योग विभाग आणि इतर मान्यवरांकडे असंख्यवेळा पत्रव्यवहाराद्वारे मांडल्याची माहिती महेंद्र बैसाणे यांनी दिली. तसेच आपण शासन दरबारी सतत पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून कोणतीही उचित दखल घेतली गेली नाही की कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या कारणास्तव नाशिकमध्ये आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कोणताही मोडता न घालता सोमवार ६ डिसेंबरनंतर आत्मक्लेश म्हणून उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बैसाणे यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे ही माहिती कळवली असून याप्रश्नी संबंधितांना योग्य ते आदेश देण्याची विनंती केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा