कल्याण दि.9 ऑक्टोबर :
श्री समर्थ रामदेव भक्त मंडळ कल्याण समस्थ राजस्थानी 36 डॉट कॉम संस्थेकडून कल्याण पश्चिमेतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.(Shri Samarth Ramdev Bhakta Mandal Kalyan Sanstha has publicly supported Mahayuti candidate Vishwanath Bhoir)
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारची धडाकेबाज कामगिरी आणि महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्यामार्फत कल्याण पश्चिमेत सुरू असणारी विकासकामे याने प्रभावित होऊन हा पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.
श्री समर्थ रामदेव भक्त मंडळ कल्याण समस्थ राजस्थानी 36 डॉट कॉम संस्थेकडून जाहीर झालेल्या या पाठिंब्यामुळे विश्वनाथ भोईर यांची ताकद आणखीन वाढली आहे.