डोंबिवली दि.30 मार्च :
डोंबिवली येथील गिरीमित्र प्रतिष्ठान आणि इतर सामाजिक संस्थाच्या सहकार्याने होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी डोंबिवली पक्षी अभयारण्य परिसरात श्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.(Shramdan camp at Dombivali Bird Sanctuary for Holi and Dhulivandana)
या दोन दिवसामध्ये मुख्य बंधाऱ्याखाली असणाऱ्या फिल्टर बंधाऱ्यात वर्षानुवर्षे साचलेला मातीचा तब्बल 2 फुटांपर्यंत गाळ बाहेर काढण्यात आला. तसेच परत माती आत येऊ नये यासाठी वरच्या भिंतीपासून मातीचा चर खणण्यात येऊन खालच्या बाजूला दगडांची भिंत तयार करण्यात आली. तर वरच्या बंधाऱ्यावर जाण्यासाठी मातीच्या पायऱ्याही तयार करण्यात आल्या. बंधाऱ्यामधून काढलेली माती बाजूला जमा करण्यात आली. जेणेकरून त्यामातीचा वापर पावसाळ्यात झाडांना टाकण्यासाठी करण्यात येणार आहे. होळीपोर्णिमा आणि धुलिवंदन असे दोन दिवस सकाळच्या सत्रात १५ स्वयंसेवकांनी मेहनत घेऊन हे सगळे श्रमदान केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षी, प्राण्यांचे आणि झाडांचे संवर्धन, संरक्षण आणि संगोपन योग्यरीत्या करण्यात येणार असल्याची माहिती गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मंगेश कोयंदे यांनी दिली.
या सामाजिक उपक्रमात गिरीमित्र प्रतिष्ठान, ॲडवेंचर इंडिया, स्वयम् चॅरिटेबल ट्रस्ट, के.वी. पेंढारकर कॉलेज माजी एनसीसी असोसिएशन, निवासी विभाग प्रतिष्ठान, रोटरी क्लब, डोंबिवली मिडटाऊन, ह.भ. प. सावळाराम महाराज वनराई, उंबार्ली ग्रामस्थांची संस्था (नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे गावातील सदस्य), रोटरी क्लब, डोंबिवली सौदामिनी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी, बैकर्स फाउंडेशन शिवसाधना समूह यांच्यासह उंबार्ली, सोनारपाडा, दावडी, भाल, धामटन, खोणी आणि निळजे या लगतच्या गावातील ग्रामस्थ आणि स्वयंसेवकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Very valuable contribution to a great environmental & social cause, had I been 50 years younger – would have liked to join