डोंबिवली दि.3 जून :
कळवा येथे रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीच्या विद्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबियांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत सांत्वन केले. (Shiv Sena will try to get a job in the family of ‘that’ woman who died in the accident)
काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत विद्या पाटील यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विद्या पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेत आर्थिक मदत केली. त्याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पाटील कुटुंबियांतील एका व्यक्तीला नोकरी मिळण्यासाठी रेल्वेमंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचेही शहरप्रमुख मोरे यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्या पाटील यांच्या मुलांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी शहर प्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर मानकामे, संजय पावशे, राहुल म्हात्रे, सोपान पाटील, बाळा म्हात्रे, प्रताप पाटील, अस्मिता खानविलकर, केतकी पवार, अंकित जाधव, सनी सुर्वे आदी शिवसैनिक उपस्थित होते.