Home ठळक बातम्या “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव तुमच्यासोबत”; त्या तिघा डोंबिवलीकरांच्या कुटुंबीयांची शिवसेना...

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव तुमच्यासोबत”; त्या तिघा डोंबिवलीकरांच्या कुटुंबीयांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली भेट

डोंबिवली दि.26 एप्रिल :
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव तुमच्या सोबत आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास, पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिघा डोंबिवलीकरांच्या कुटुंबियांना देण्यात आले. (“Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party is always with you”; Shiv Sena Thackeray faction leaders met the families of the three Dombivalikars)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे, उपनेते विजय साळवी, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी दिवंगत हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्या कुटुंबियांची नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी या पदाधिकाऱ्यांनी हे आश्वासन देण्यासह सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पक्षाच्यावतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असेही स्पष्ट केले.

काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात झालेली ही घटना अतिशय दुर्दैवी असून केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी या कुटुंबियांच्या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एवढ्या मोठ्या पर्यटनस्थळी आवश्यक त्या सुरक्षेची आणि सैनिकांच्या उपस्थितीची व्यवस्था केंद्र सरकारने का केली नाही ? असा सवालही त्यांच्याकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

यावेळी कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, माजी स्थायी समिती सभापती विलास म्हात्रे, डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, उपशहर प्रमुख सुरज पवार, विभाग प्रमुख प्रमोद कांबळे, प्रदीप सावंत, शाम चौगुले, नितीन पवार, युवा सेनेचे आदित्य पाटील, ऋतूनिल पावस्कर, प्रसाद ठुकुरूल, आघाडीच्या सुप्रिया चव्हाण, प्रियंका विचारे, राहुल चौधरी, सागर कांबळे, परेश म्हात्रे विपुल म्हात्रे तसेच शिवसैनिक, युवासैनिक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा