मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पारदर्शी कामामुळे झालो प्रभावित : नाना राठोड
डोंबिवली दि.18 ऑक्टोबर :
मराठवाड्यातील शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पारदर्शी कामामुळे प्रभावित होऊन आम्ही हा प्रवेश केल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे काम पाहिले आहे. महाराष्ट्राला अशा नेत्यांची गरज असून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा आहेत. आम्हीही आता मराठवाड्यामध्ये सिल्लोड, नांदेड, उस्मानाबाद आदी सर्व भागात पक्षवाढीसोबत बळकटीसाठी झटणार असल्याचे मराठवाडा येथील राजपूत समाजाचे नेते माधव सिंह राजपूत उर्फ अशोक राठोड यांनी व्यक्त केले.
बदनापूर विधानसभेचे भाजपचे आमदार नारायण कुचे, कल्याण जिल्हा सरचिटणीस १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर (नंदू) परब, दत्ता माळेकर यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. डोंबिवली पूर्वेकडील ठाकूर सभागृहात हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने अनिल राठोड रामेश्वर काळे, योगेश ठोंबरे समाधान वाघ लहू तिडके आदी कार्यकर्त्यांचा समवेश होता.