Home ठळक बातम्या कोवीड काळातील भ्रष्टाचारात शिवसेनेने वर्ल्ड रेकॉर्ड केला – भाजप नेते किरीट सोमय्या

कोवीड काळातील भ्रष्टाचारात शिवसेनेने वर्ल्ड रेकॉर्ड केला – भाजप नेते किरीट सोमय्या

 

एमएमआर रिजनमधील महापालिकांचा कोवीड भ्रष्टाचार महिन्याभरात जनतेसमोर आणण्याचाही इशारा

डोंबिवली दि. 13 डिसेंबर :
कोवीड काळातील भ्रष्टाचारामध्ये शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केल्याचे सांगत येत्या काळात मुंबई महापालिकेसह एमएमआर रिजनमधील महापालिकांमधील कोवीड भ्रष्टाचार लोकांसमोर आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डोंबिवलीत दिला. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हातर्फे डोंबिवलीतील ठाकूर हॉल येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ओळखीची एक व्यक्ती आणि आणखी एक अधिकारी यांनी कशा पद्धतीने 100 कोटीचे कोविड कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला मिळाले ते पुराव्यानिशी आपण दाखवणार आहोत. तसेच पुढील महिनाभराच्या काळात एमएमआर रिजनमधील महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांचा कोवीड भ्रष्टाचारही आपण लोकांसमोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

तर एसटी कर्मचारी संपविषयी बोलताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री सध्या गायब आहेत, त्यांची प्रकृती लवकर चांगली होवो. हे सरकार कोमात चालले आहे याची काळजी आहे. वीज गायब होते, एसटी कर्मचारी आत्महत्या करतात. तरी अनिल परब म्हणतात एसटी चालू झाली, पण एसटी कुठे आहे असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, शशिकांत कांबळे, नंदकिशोर परब, पूनम पाटील, मोरेश्वर भोईर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपा नेते सोमय्या यांनी वरील इशारा दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा