सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार अंमलबजावणी
कल्याण – डोंबिवली दि.1 मार्च :
येत्या रविवारी कल्याण शीळ मार्गावरील प्रीमियर मैदानात शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर कल्याण – शीळ रस्त्यासह अनेक महत्त्वाच्या हायवेंवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे बदल लागू असतील अशी माहिती वाहतूक विभगाचे डीसीपी डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
या वाहतूक बदलांनुसार कल्याण शीळ मार्गासह नवी मुंबईच्या कळंबोली – तळोजा ते मुंब्रा बायपास, नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते मुंब्रा बायपास, दुर्गाडी चौक ते मेट्रो मॉल, वालधुनी चौक ते कल्याण पुर्व, श्रीराम चौक ते कोळसेवाडी, नेवाळी नाका ते कोळसेवाडी, तळोजा बायपास ते खोणी नाका या महत्त्वाच्या मार्गावर सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
या मर्गाऐवजी पर्यायी मार्गांवरून जड अवजड वाहनांची वाहतूक वळवण्यात येणार असल्याचेही डी सी पी डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले आहे.