Home ठळक बातम्या डोंबिवलीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा निर्धार

डोंबिवलीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा निर्धार

भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यात ज्येष्ठ मंडळींचे प्रचंड योगदान – मंत्री रविंद्र चव्हाण

डोंबिवली दि.20 ऑक्टोबर :
डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला असून तो तसाच अभेद्य राखण्याचा निर्धार भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ब्राह्मण सभा सभागृहात भाजपच्या सर्व ज्येष्ठ माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये डोंबिवलीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा ठाम निर्धार या मेळाव्याला उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळींनी केला.(Dombivi Pwd minister ravindra chavhan & senior BJP leaders)

भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की, जिथे कार्यकर्त्याचा सन्मान होतो. कै. रामभाऊ म्हाळगी, दिवंगत नायब राज्यपाल राम कापसे, स्व. दिगंबर विशे सर, स्व.संत सर,स्व.कांतबाबू माजी मंत्री जगन्नाथ पाटील, संजय केळकर, पद्माकर कुलकर्णी (पदू काका) यांच्यासह के आर जाधव, शशिकांत कांबळे, विद्यमान अध्यक्ष नाना सूर्यवंशी आदींचे भाजप पक्षाच्या वाढीसाठी खूप मोलाचे योगदान खूप आहे. या सगळ्यांनी पक्षाला बळकटी दिली. शून्यातून पक्ष उभा केला. त्यांच्यामुळे आता पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत, त्यांच्या कष्ट, पक्षाविषयी प्रेम, आदर, आपुलकी, एकीला माझा सॅल्युट अशा शब्दात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ मंडळींचा त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल आदर व्यक्त केला.

ज्यावेळी ही सगळी मंडळी झटत होती तो काळ प्रतिकूल परिस्थितीचा होता, हे इतिहास सांगतो. आता बऱ्याच प्रमाणात अनुकूल दिवस आले असून प्रतिकुल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची ताकद या ज्येष्ठ मंडळींमध्ये आहे.


त्यांनी अपार मेहनत घेऊन, एकेक कार्यकर्ता पक्षात कसा टिकून राहील याची काळजी घेतली. त्यांनी लावलेल्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे, त्या सगळ्यांची मेहनत आता कामाला येत आहे असेही चव्हाण म्हणाले.

या मेळाव्यात पक्षाचे आतापर्यंत झालेले माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. भाजपमध्ये पन्नासहुन अधिक वर्ष होऊनही त्यांचे पक्षाबद्दल असलेले अपार प्रेम, आपुलकी पाहून मनाला उभारी मिळते, एकेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता हे ऊर्जा, स्फूर्तिस्थान असल्याची भावना रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. आताच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखे आहे. ही ऊर्जास्थानं आहेत म्हणूनच आपण सगळे कार्यरत आहोत, त्या सगळ्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्या सगळ्यांचा मी ऋणी असल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले.

पुन्हा एकदा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी त्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले असून शतप्रतिशत भाजप असे सांगून मला बळकटी दिली आहे. ते सगळे त्यांच्या स्तरावरून आत्ताही पूर्णपणे पक्षाचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा