Home ठळक बातम्या अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना आज (25जुलै 2024)सुट्टी जाहीर

अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना आज (25जुलै 2024)सुट्टी जाहीर


ठाणे दि.25 जुलै :

ठाणे जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 1 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना शिक्षण विभागातर्फे आज 25 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.

तर सकाळ सत्रातील विद्यार्थी शाळेत आले असल्यास ते विद्यार्थी घरी सुरक्षितपणे पोहोचतील याची दक्षता मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घेण्याचे निर्देशही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा