Home ठळक बातम्या स्कूल चले हम: वंचित समूहातील चिमुकल्यांच्या शाळा प्रवेशाचा आनंदोत्सव

स्कूल चले हम: वंचित समूहातील चिमुकल्यांच्या शाळा प्रवेशाचा आनंदोत्सव

कल्याण दि.१५ जून : 
रोजच्या जगण्याच्या या संघर्षात वंचित समूहातील मुलांच्या शिक्षणाकडे काहीसा कानाडोळाच होत असतो. मात्र या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वाघेरे पाडा शाळा आणि अन्न अधिकार अभियानाच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यात मुलांचा शाळेतील पहिला प्रवेश दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

पहिलीत दाखल करण्यात आलेल्या मुलांना पालकांनी पाटावर बसवून वाजत गाजत लेझिमच्या तालात शाळेमध्ये प्रवेश करताना स्वागत केले. शिक्षिका आशा शिंगाडे आणि अर्चना भोये यांनी मुलांचे वर्गप्रवेश औक्षण करून व फुल देऊन स्वागत करून मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. तर खास सजविण्यात आलेल्या वर्गांमध्ये या विद्यार्थ्यांना बसवण्यात आले.

विशाल जाधव यांनी उपस्थित पालक आणि मुलांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्व पटवून देत पालकांनी ही जबाबदारीने वागण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच मुलांचे शिक्षण परिपूर्ण असण्यासाठी आपल्या सर्वांची बांधीलकी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

एकीकडे शहरातील मोठ्या शाळांमधील आजचा प्रवेश दिन तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षणाकडे गोडी लागावी म्हणून करण्यात आलेला शाळा प्रवेशदिन उपक्रम अतिशय सुंदररित्या आयोजित करण्यात आला होता. ग्रामस्थ महेंद्र भगत, अंगणवाडी सेविका अंजना कडव तसेच कालीबाई लचकेसह मुलांचे पालक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा