मुंबई दि.3 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचे पती साईनाथ तारे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी हळूहळू जोर धरू लागली असतानाच तारे यांच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. साईनाथ तारे यांनी आज दुपारी मातोश्री येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे.
याबाबत मोबाईलद्वारे विचारणा केली असता त्यांनी या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला असून आज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही एलएनएन शी बोलताना दिली आहे.