Home ठळक बातम्या साईश्रद्धा सेवा संस्थेच्या वतीने १० मान्यवरांचा ‘डोंबिवली सन्मान’ पुरस्काराने गौरव

साईश्रद्धा सेवा संस्थेच्या वतीने १० मान्यवरांचा ‘डोंबिवली सन्मान’ पुरस्काराने गौरव

 

डोंबिवली, दि.8 एप्रिल :
साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था, डोंबिवली यांच्या वतीने श्रीराम नवमी २०२५ निमित्ताने आयोजित करण्यात आलेला पंधरावा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साही आणि भाविकांच्या सहभागाने पार पडला. यानिमित्त साईबाबांच्या पालखीची भव्य मिरवणूक, साईबाबांचे दर्शन सोहळा तसेच साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात सर्व महिलांना हळदीकुंकू वाटप करून गुलाब पुष्प देण्यात आले. यावेळी पंचवीस महिला बचत गटांच्या सदस्या आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजार ते दीड हजार लोकांनी साई महाप्रसादाचा लाभ घेतला.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डोंबिवलीकरांचा “डोंबिवली सन्मान” या विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉ. अमित लोखंडे, पत्रकारिता क्षेत्रातील आकाश गायकवाड, आरोग्य सेवेसाठी डॉ. सचिन बोंडे, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वंदना बोरकर, गरजू मुलांना अल्पदरात लस उपलब्ध करून देणारे कल्पेश सावंत, रोजगारनिर्मिती व बांधकाम क्षेत्रातील ज्ञानेश्वर दळवी, सामाजिक कार्यातील एकनाथ म्हात्रे, उद्योग क्षेत्रातील राम आणि लक्ष्मण म्हात्रे बंधू आदी अशा दहा मान्यवरांचा समावेश होता.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ तिरपणकर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाधिकारी रश्मी घोडविंदे, घे भरारी लोकसंचालित साधन केंद्राच्या मॅनेजर रोहिणी शिंदे, नवचैतन्य लोकसंचालित साधन केंद्राच्या अंजली परब, बँक ऑफ महाराष्ट्रच्या सविता पावसकर यांची उपस्थिती होती. तसेच डोंबिवलीचे नगरसेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, प्रकाश भोईर, सरोजिनी भोईर, जनसेवक बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील आणि विलास म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कैलास सणस, कार्याध्यक्ष प्रवीण (पऊ) साळवी, कार्यकारिणी सदस्य विजय भोईर, उदय सावंत, संघटिका व खजिनदार ज्योती उबाळे, मंगल पांचाळ, मयुरी गायकर, तृप्ती चौव्हाण, अलका सूर्यवंशी, पूजा दुधाळ, कार्यकारी सदस्य प्रकाश उबाळे, संदीप दरेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालनाची जबाबदारी पुनम खंदारे आणि पूजा दुधाळ यांनी पार पाडली.

या कार्यक्रमामुळे डोंबिवलीतील सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे योगदान अधोरेखित झाले असून, नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा