Home ठळक बातम्या फुलझाडांच्या जतनाचा संदेश देत कल्याणातील 10 सायकलवीरांची “सह्याद्रीस्वारी”

फुलझाडांच्या जतनाचा संदेश देत कल्याणातील 10 सायकलवीरांची “सह्याद्रीस्वारी”

नामवंत डॉक्टर, उद्योजक, वकील,आयटी तज्ञांचा सहभाग

कल्याण दि.14 डिसेंबर :
निसर्गामध्ये फळ झाडांसोबतच फुलझाडांचेही तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या फुलझाडांच्या संवर्धन आणि जतन करण्याचा सामाजिक संदेश देण्यासाठी कल्याणातील 10 सायकलवीर सह्याद्रीच्या दिशेने रवाना झाले. महाराष्ट्राची “फ्लॉवर व्हॅली” अशी ओळख असलेल्या कास पठार सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गसुंदर ठिकाणांना ते भेट देणार आहेत. (“Sahyadriswari” of 10 cyclists from Kalyan, giving the message of saving flowers.)

कल्याणातील बाईकपोर्ट सायकलिंग ग्रुपतर्फे गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण रक्षणासह विविध महत्त्वाचे सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात सायकल मोहिमा राबवल्या आहेत. ज्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, समाजातील गरजूंना शिक्षण, गरीब रुग्ण, कोवीड जनजागृती अशा ज्वलंत विषयांद्वारे आपली सामाजिक जबाबदारी जपत आले आहेत. यंदाचे त्यांचे हे सहावे वर्ष असून फुलझाडांचे संवर्धन करण्याचा संदेश घेऊन हे दहा सायकलस्वार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तब्बल 1 हजार किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. कल्याणातील रनमशीन अशी ओळख असणारे सुप्रसिद्ध धावपटू दिलीप घाडगे यांनी फ्लॅगऑफ केल्यानंतर हे सायकलस्वार आपल्या मोहिमेला रवाना झाले.

पाहा व्हिडिओ 👇👇
https://www.instagram.com/reel/DDimWdSiEES/?igsh=MXRqdm1nejgybHJmZw==

आजपासून सुरू झालेला त्यांचा हा दहा दिवसांचा सायकल प्रवास कल्याण, माळशेज, नारायणगाव, शिक्रापूर, जेजुरी, फलटण, माळशिरस, म्हसवड, वळूच, सातारा, कास पठार, तापोळा, महाबळेश्र्वर, वाई, मांढरदेव, भोर, खेड शिवापूर, लवासा, ताम्हिणी घाट आणि पाली करून पुन्हा कल्याणमध्ये समाप्त होणार असल्याची माहिती डॉ. रेहनुमा यांनी दिली.

कल्याणातील उद्योगपती, डॉक्टर, आय टी तज्ज्ञ आदी मान्यवर मंडळी यामध्ये सहभागी झाली असून त्यामध्ये डॉ. रेहनूमा, सहिर शेख, सी. के. साबळे, अनिल उच्छील, अमित मोरे, आलतमाश कुरेशी, मिलिंद देशमुख, किरण शेट्टी, प्रतीक गरवारे, स्वामिनाथन अय्यर या दहा जणांचा समावेश आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा