Home क्राइम वॉच कल्याण रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

कल्याण रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

बॉम्ब स्कॉडकडून संपुर्ण कल्याण स्टेशन परिसराची तपासणी

कल्याण दि.18 डिसेंबर :
कल्याण रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन करून अफवा पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी
मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याला हा निनावी फोनद्वारे ही माहिती दिली होती. मात्र पोलीस यंत्रणांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने डॉग स्कॉडच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण रेल्वे स्टेशनची कसून तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याला हा निनावी फोन आला होता. “मी दिल्लीवरून बोलतोय, असे म्हणत एका व्यक्तीचा नंबर सांगत अज्ञात व्यक्तीने कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. तसेच कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी तत्काळ ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली.

त्यानुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले. पोलीस प्रशासनाने तब्बल तीन ते चार तास कल्याण रेल्वे स्टेशनवर सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर ही बॉम्बची निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये ही खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा