Home ठळक बातम्या रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे १५ शिक्षकांचा नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मान

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे १५ शिक्षकांचा नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मान

 

कल्याण दि. ३० सप्टेंबर :
येथील रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे रोटरी साक्षरता मिशन अंतर्गत शहरी – ग्रामीण भागातील १५ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने गौरविण्यात आले. बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यात माजी जिल्हा प्रांतपाल रो. डॉ. चंद्रशेखर कोलवेकर, सहप्रांतपाल अभिजीत पंडित , क्लबचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य , सचिव रो. बिजू उन्नीथन, लिटरसी कमिटी चेअरमन रमेश मोरे आणि प्रकल्प प्रमुख नामदेव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी इंडिया साक्षरता मिशनच्या विशिष्ट निवड पद्धतीने ११ शाळांमधील १२० शिक्षकांचे प्रत्येक शाळेतील दहा विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत मूल्यांकन करून विविध शाळांच्या १५ शिक्षकांचा नेशन बिल्डर ॲवार्डने सन्मान करण्यात आला. त्यात श्री गजानन विद्यालय प्राथमिकच्या संगीता कल्याणकर, माध्यमिकच्या  नितल चव्हाण, शारदा मंदिर हायस्कूलच्या जयश्री चौधरी, बालक मंदिर संस्थेच्या कॅ. ओक हायस्कूलचे बाळकृष्ण शिंदे, कैलास सरोदे, सुभेदारवाडा हायस्कूलच्या रंजना पाटील, माध्यमिक विद्यालय अटाळीचे प्रभाकर शिंदे, टिळकनगर विद्यामंदिरचे सचिन हमरे, हिरामण अहिरे, शिशु विकास माध्यमिक विद्यालयाचे  सतीश भोईर, पाटील बालमंदिर मोहने येथील अनिल तारमळे, उमेश घोंगडे, जनाई विद्यालय म्हारळच्या आशा गिरे आणि रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेतील शोभा माळी आणि कल्पेश शिंदे आदी विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षकांचा समावेश आहे.

शिक्षणाचे सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा सन्मान दिला जातो. मूल्यांकनाद्वारे पात्र शिक्षकांची निवड करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येतो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी माजी जिल्हा प्रांत पाल रो. डॉ. चंद्रशेखर कोलवेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यांच्याही शालेय जीवनातील शिक्षक आणि विद्यार्थी या आठवणींना उजाळा दिला. क्लबचे अध्यक्ष रो. डॉ सुश्रुत वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर रो. सुखदा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख अतिथींचा परिचय रोटरीयन केदार पोंक्षे यांनी तर पुरस्कारीत शिक्षकांचे थोडक्यात गुणवर्णन प्रकल्प प्रमुख रो नामदेव चौधरी यांनी केले.

या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सर्व सदस्य, सत्कारार्थी शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय, शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा