Home ठळक बातम्या केडीएमसीच्या २७ गावांमधील रस्ते हजारो पथदिव्यांनी होणार प्रकाशमय – आमदार राजू पाटील

केडीएमसीच्या २७ गावांमधील रस्ते हजारो पथदिव्यांनी होणार प्रकाशमय – आमदार राजू पाटील

कल्याण ग्रामीण दि.13 ऑक्टोबर :
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या 27 गावांमधील रस्ते आता पथ दिव्यांनी उजळून निघणार आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी या कामासाठी नगरविकास विभागाकडून निधी मंजूर करून आणला आहे. (Roads in 27 villages of KDMC will be illuminated with thousands of street lights – MLA Raju Patil)

या २७ गावांमध्ये सध्या असणारी पथदिवे व्यवस्था ही ग्रामपंचायत काळातील असून ही व्यवस्था तांत्रिकदृष्टया सक्षम आणि पुरेशी नाहीये. तसेच या भागांत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरही पथदिवे व्यवस्था नसल्याने या रस्त्यांचा सर्व्हे करुन नविन पथदिव्यांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानूसार शासनाच्या नगरविकास विभागाने यासाठी निधी मंजुर केला. या पथदिवे व्यवस्थेची निविदा प्रक्रिया सुरु असुन लवकरच काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली. त्यानुसार २७ गावातील मुख्य आणि अंतर्गत अशा एकूण २०७ रस्त्यांवर 4 हजार 679 पोल उभारून पथदिवे उभारण्यात येणार असल्याने हा भाग आता उजळून निघणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

दरम्यान या कामांसोबत काल दसऱ्याच्या मुहूर्तावर भोपर गावातील 23 कोटींच्या, लोढा हेवनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासह इतर साडेसहा कोटींच्या कामांचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप शहराध्यक्ष प्रभाकर जाधव, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, भाजपाचे उप जिल्हाध्यक्ष संदीप माळी, प्रसाद माळी, अमर माळी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा