
कल्याण दि. 3 फेब्रुवारी :
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देसानुसार कल्याण तालुक्यातील 41 ग्राम पंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत जाहीर झाली.
गेल्या महिन्यात 15 तारखेला 41 पैकी 20 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. तर 18 जानेवारीला त्याची मतमोजणी पार पडली होती. आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमाती 3,नागरिकांचा मागास प्रवर्ग 11 जागा आणि स्त्रियांकरता एकूण जागांपैकी 12 जागा राखीव अशा पद्धतीने आरक्षण काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार दिपक आकडे यांनी दिली.