
कल्याण दि.१९ जून :
महावितरणच्या डोंबिवली विभाग कार्यालयांतर्गत डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक 4 आणि त्यांतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत करण्यात आले आहे.
उपविभाग 4सह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड आणि जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश आहे. ही सर्व कार्यालये आता गणेश मंदिरच्या मागे, पंडित दिनदयाल रोड, कैलास भुवन बिल्डींग जवळ, डोंबिवली (पश्चिम) या नवीन पत्त्यावर येत्या शुक्रवारी 21 जूनपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
सध्या ही कार्यालये नाख्ये एव्हरेस्ट हाऊस,द्वारकाच्यावर, रेल्वेस्टेशन जवळ, डोंबिवली पश्चिम येथे भाडयाच्या जागेत कार्यरत आहेत. मात्र शुक्रवारपासून त्यांच्या जागेमध्ये बदल होणार असून संबधित ग्राहकांनी या नवीन बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
12 pass