डोंबिवली दि.14 नोव्हेबर :
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत विधानसभा उमेदवार दिपेश म्हात्रे यांच्या जाहीरनाम्याचे काल प्रकाशन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासह “दिपेश म्हात्रे घेऊन आला ठाकरेांची सेना” या गाण्याचे अनावरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
डोंबिवलीतील विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यामध्ये स्व. रामभाऊ कापसे प्रशासकीय भवन – डोंबिवली पूर्वेतील धोकादायक स्थितीत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या इमारतीच्या पुनर्विकासाद्वारे, सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली आणण्यासाठी स्व. रामभाऊ कापसे एकात्मिक प्रशासकीय भवन,
१ लाख नव्या रोजगार संधी – वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस सेंटरद्वारे एक लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती,डोंबिवली पश्चिमेतील ३५० एकर रेल्वे जागेचा व्यावसायिक विकास करुन आयटी हब, बँकिंग क्षेत्र, आणि मोठ्या व्यवसाय उद्योगांना येथे आणण्याचा संकल्प, डोंबिवलीत उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी एक सुसज्ज सरकारी रुग्णालय यासह वाहतूक, रस्ते आणि पार्किंग समस्या, पाणीटंचाई वेद पाठशाळा, वयोवृद्ध देखभाल केंद्र आणि २४x७ मदतवाहिनी आदी प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर या जाहीरनाम्यातील सर्व मुद्द्यांद्वारे, डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना तयार केल्याची ग्वाही दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिली.