डोंबिवली दि.26 जून :
डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील विविध समस्यांचे रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर निवारण न झाल्यास डोंबिवलीतील नागरिकांसोबत आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याचे परिणाम रेल्वे प्रशासनाला भोगावे लागतील अशा शब्दांत युवासेनेतर्फे इशारा देण्यात आला आहे. (Redressal of grievances at Dombivli railway station otherwise agitation with citizens; Yuva Sena’s warning to Railway Administration)
डोंबिवली रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या डोंबिवलीतील हजारो नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी मंगळवारी डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाला विविध विषयांवर जाब विचारत या समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी युवासेना निरीक्षक अभिषेक चौधरी, उप जिल्हा अधिकारी योगेश म्हात्रे, विधानसभा अधिकारी सागर दुबे , विधानसभा समन्वयक स्वप्निल विटकर, डोंबिवली शहराधिकारी सागर जेधे,शहर समन्वयक ओंकार तांबे, शाखाप्रमुख परेश म्हात्रे, पवन म्हात्रे, विपुल म्हात्रे, बाळकृष्ण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रमूख मुद्द्यांवर झाली चर्चा…
- ५ नंबर फलाटावरिल अपुरी शेड.
- ३ नंबर फलाटावरिल महिला डब्बा समोर प्रवाशांना उभं राहण्यासाठी अपुरी जागा.
- फलाटावरिल अस्वच्छता गृह.
- वारंवार उशीर ने धावणारी लोकल सेवा.