Home ठळक बातम्या रेकॉर्डब्रेक : कल्याण डोंबिवलीत अवघ्या साडेनऊ तासांत 125 मिमी पाऊस

रेकॉर्डब्रेक : कल्याण डोंबिवलीत अवघ्या साडेनऊ तासांत 125 मिमी पाऊस

 

कल्याण – डोंबिवली दि.19 जुलै :
आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने कल्याण डोंबिवलीला अक्षरशः धु -धु धुतले आहे. त्यामुळेच सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीत रेकॉर्डब्रेक अशी 125.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील उर्वरित 5 तालुक्यांपेक्षा हा पाऊस किती तरी अधिक आहे. इतक्या कमी कालावधीत झालेला हा गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे.

आज सकाळपासून वरुण राजाने कल्याण डोंबिवलीत केवळ ठाण मांडले नाहीये. तर साफ झोडपून काढले आहे. कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व, एमआयडीसी परिसर, ग्रामीण भाग आदी भागात तर पावसाने नकोसे केले आहे. सखल भागातील अनेक चाळींतील घरात पावसाचे पाणी शिरल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर काही इमारती आणि सोसायटीच्या आवारातही पावसाचे पाणी शिरलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनानेही काही लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असून पावसाचे रौद्ररूप पाहता संपूर्ण प्रशासन सध्या हाय अलर्टवर आहे. तर या मुसळधार पावसामुळे 15 वर्षांपूर्वी आलेल्या 26 जुलैच्या महापुराची अनेकांना आठवण झाली आहे.

आज (19 जुलै2021) सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.00पर्यंत झालेला पाऊस…

1) ठाणे -98.92 मिमी

2) कल्याण -125.4 मिमी

3) मुरबाड -34.6 मिमी

4) भिवंडी -79.25 मिमी

5) शहापूर -38.1 मिमी

6) अंबरनाथ -87.62 मिमी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा