पलावा परिसरात प्रचाराचा झंजावात
डोंबिवली दि.8 नोव्हेंबर :
कोणत्याही वेळी सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जात त्याला हवी असलेली मदत करणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणजे राजेश मोरे. कोणत्याही वेळी उपस्थित राहून जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेने दिलेली उमेदवारी हा जनतेचा सन्मान आहे असे मत सर्वसामान्य नागरिकांनी मांडले. विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडणूक लढवत असलेले राजेश मोरे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. आज गुरुवारी सकाळी त्यांच्या प्रचार दौऱ्याला कासाबेला गोल्ड येथून सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात राजेश मोरे यांचे स्वागत केले. या रॅलीत राजेश मोरे यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. (rajesh-more-is-the-leader-who-supports-to-the-common-man-spontaneous-reaction-of-ordinary-citizens)
कमीत कमी वेळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता यावे यासाठी प्रभाग निहाय पदयात्रेचे नियोजन कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे राजेश मोरे यांनी केले आहे. आज गुरुवारी (ता. ८) रोजी प्रचाराची सुरुवात कासाबेला परिसरातून करण्यात आली.कासाबेला गोल्ड, लोढा हेवन,जय भवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रीन पार्क तीन नंबर गेट, कॅस्पेनिया सोसायटी, शिवसेना शाखा पलावा, निळजेगाव, वडवली गाव हेदुटने गाव, कोळेगाव येथून दत्त मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप करण्यात आला तर दुपारी डोंबिवली पूर्वेकडील अय्यप्पा मंदिरात दर्शन घेऊन राजाजी पथ, आयरेगाव, तुकाराम नगर, बहिणाबाई उद्यान, नांदिवली नाला, एकता नगर,संगीता वाडी, दत्तनगर कडून दीडशे फुटी झेंडा चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
पलावा चौकातून दुचाकी आणि रिक्षांची रॅली आणि कार्यकर्त्यांच्या साथीने पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना पदाधिकारी गजानन पाटील, सुभाष पाटील , नगरसेविका पूजा पाटील, अमोल भोगले, सतरपाल सिंग,भाजप पदाधिकारी रवी पाटील, सतीश सिंग, नागेंद्र शर्मा या शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. जागोजागी नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत करत ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिला.
आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे राजेश मोरे. आमच्यासारख्या तळागाळातील लोकांच्या समस्या त्यांना माहित आहेत आणि आमदार झाल्यानंतर ते या समस्या नक्कीच सोडवतील आमच्या अपेक्षा पूर्ण करतील. शिवसेनेने खूप चांगला निर्णय घेत राजेश मोरे यांना उमेदवारी दिली आहे आता त्यांना निवडून देणे ही आमच्यासारख्या जनतेची जबाबदारी असल्याचे मत सारिका देसाई या गृहिणीने यावेळी व्यक्त केली.
आमच्या इथल्या कोणत्याही समस्येसाठी स्थानिक नेत्याला संपर्क करताच राजेश मोरे तातडीने त्या समस्या सोडवितात. आमची कामे तेच मार्गी लावतात. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने या भागात अनेक विकास कामे झाली आहेत त्याना जर आमदार म्हणून राजेश मोरे यांची साथ लाभली तर या भागातील प्रश्न आणखी वेगाने मार्गी लागतील. राजेश मोरे हा सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करणारा व्यक्ती असल्याचे एस.एस.पांडीयन म्हणाले.