रविवार, २१ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पार पडणार प्रकाशन सोहळा
कल्याण दि.20. एप्रिल :
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. या सर्व विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या ‘विकास दशक – दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची ‘ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत रविवार, २१ एप्रिल रोजी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
दहा वर्षात झालीत इतकी विकासकामे…
गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत तर अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी विविध शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कल्याण शिळफाटा रस्त्याचे सहा पदरिकरण, ऐरोली काटई फ्री वे, काटई – अंबरनाथ रस्त्याचे काँक्रीटीकरण, कल्याण रिंग रोड या महत्वाच्या मार्गाची उभारणी करण्यात आली आहे. तर वाहन चालकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मोठागाव मानकोली उड्डाणपूल, खारेगाव रेल्वे उड्डाणपूल, शीळ फाटा सहा पदरी उड्डाणपूल, पलावा उड्डाणपूल या महत्वाच्या उड्डाणपुलांची उभारणी झाली आहे. तर विठ्ठलवाडी – कल्याण उन्नत मार्ग, महामार्ग रिंग रोड, कल्याण फाटा उड्डाणपूल यांसारखी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत. तर मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो १२ ची पायाभरणी झाली असून येत्या दोन वर्षात मेट्रो नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. याचबरोबर आरोग्य क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी उल्हासनगर येथे मोफत रुग्णालय, कामगार रुग्णालयाची उभारणी, डोंबिवली येथे कॅन्सर आणि प्रसूती रुग्णालय, अंबरनाथ येथे अत्याधुनिक रुग्णालय, कल्याण, डोंबिवली, तसेच कळवा येथे विविध आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तर लवकरच अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. याच बरोबर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात क्रीडा क्षेत्रात विविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक भवनांची देखील उभारणी झाली आहे.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अशा सर्वांगाने विकसित झालेल्या या मतदासंघातील विकासकामांचा सविस्तर आढवा “विकासदशक – दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची” या कार्य अहवालातून घेण्यात आला आहे. याचे प्रकाशन रविवारी, २१ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.