Home ठळक बातम्या महागाईविरोधात युवासेनेचे कल्याणात चॉकलेट – पेढे वाटून आणि टाळ्या-थाळ्या वाजवून निषेध आंदोलन

महागाईविरोधात युवासेनेचे कल्याणात चॉकलेट – पेढे वाटून आणि टाळ्या-थाळ्या वाजवून निषेध आंदोलन

 

कल्याण दि.३ एप्रिल :
वाढत्या महागाईविरोधात युवासेनेने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. डोंबिवलीपाठोपाठ कल्याणातही युवासेनेतर्फे अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केंद्र सरकारचां निषेध केला. युवासेनेचे प्रदेश सहसचिव योगेश निमसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मोदी सरकार हाय हाय, थाली बजाओ खुशिया मनाओ यासारख्या अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या. कल्याण पश्चिमेच्या प्रेम ऑटो परिसरात झालेल्या या आंदोलनामध्ये युवासेनेने लोकांना चॉकलेट, पेढे, गुलाबाची फुलं वाटून तसेच थाळ्या आणि टाळ्या वाजवून महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारच निषेध केला.

देशात सत्तेमध्ये येण्यासाठी केंद्र सरकारने मोठ मोठी आश्वासने दिली. प्रत्यक्षात मात्र देशात महागाईचा आगडोंब उसळला असून सामान्य जनता त्रासून गेल्याचे युवासेना सहसचिव योगेश निमसे यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात कोरोना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवा असे सांगितले. त्याचाच आधार घेत आज आम्ही टाळ्या आणि थाळ्या वाजवून हे भाजप सरकार हटवण्याचा प्रयत्न केल्याचे योगेश निमसे यांनी सांगितले. यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा