Home ठळक बातम्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा बक्षीस समारंभ संपन्न

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा बक्षीस समारंभ संपन्न

कल्याण दि.16 सप्टेंबर :
कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सन 2023 चा बक्षीस समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सन 2023 म्हणजेच गेल्यावर्षीसाठी
महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील पुढील गणेश मंडळांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एसीपी घेटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह प्रदान करून पुढील वर्षीही सामाजिक कार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून यावेळी करण्यात आले. यासोबतच परीक्षक म्हणून काम केलेल्या किशोर देसाई आणि रितेश ढोमसे यांचाही एसीपी कल्याणजी घेटे यांच्याकडून प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

विजेते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ…
1) प्रथम क्रमांक – शिवनेरी क्रीडा मंडळ जोशीबाग
2) द्वितीय क्रमांक – उत्कर्ष मित्र मंडळ, रामबाग लेन नंबर झिरो
3) तृतीय क्रमांक – बाळ गोपाळ मित्र मंडळ, अपना बाजार समोर, रामबाग मेन रोड
4) उत्तेजनार्थ पारितोषिक – मुरारबाग मित्र मंडळ, मुरारबाग

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा