पोलीस कार्यकाळात दुसऱ्यांदा मिळाला बहुमान
कल्याण दि.२५ जानेवारी :
राज्य गुप्त वार्ता विभाग कल्याणात कार्यरत असलेल्या वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी संभाजी नारायण देशमुख यांना पोलीस दलातील विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाला असून त्यामध्ये कल्याणातील एस. एन. देशमुख यांचाही समावेश त्यांच्या कारकिर्दीतील हे दुसरे राष्ट्रपती पोलीस पदक आहे.
राज्य गूप्तवार्ता विभाग व पोलीस दलातील तब्बल ३७ वर्षांच्या कार्यकाळात देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बहूमूल्य मार्गदर्शनाखाली केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमूळे त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे. यापूर्वी सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्येही देशमुख यांना पोलीस दलातील अतुलनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ यंदाही प्रजासत्ताकदीनी त्यांना दुसऱ्यांदा पोलीस दलातील सर्वोच्च पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे संभाजी देशमुख यांच्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपकुमार सिंह आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव यांनाही यंदाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.