Home ठळक बातम्या पुस्तकांपलिकडचे व्यवहार ज्ञान: महापालिका शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळताहेत अग्निशमनाचे धडे

पुस्तकांपलिकडचे व्यवहार ज्ञान: महापालिका शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळताहेत अग्निशमनाचे धडे

 

कल्याण डोंबिवली दि.1 एप्रिल :
एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आपल्या शाळांचे कायापालट अभियान सुरू असून त्यासोबतच आता आग लागल्यानंतर करावयाच्या उपाय योजनांबाबतही शाळांमध्ये जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाकडून अग्निशमनाचे धडे दिले जात आहेत. (Practical knowledge beyond books: Teachers and students in municipal schools are getting firefighting lessons)

महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये fire extinguisher यंत्रणा बसविण्यात आली आहे. या fire extinguisher चा वापर कसा करावा, आग लागण्याची प्रमुख कारणे काय, आग कशी विझविता येते याची माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी आणि केंद्र अधिकारी विनायक लोखंडे यांच्याकडून दिली जात आहे. त्यासोबतच शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे.
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ही अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासोबत तिथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना त्याची सखोल माहितीही दिली जात आहे.

विशेष म्हणजे यासाठी कोणताही नविन खर्च करण्यात येत नसून कोवीडच्या काळात टाटा आमंत्रण येथे बसविण्यात आलेल्या fire extinguisher चा पुनर्वापर महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आला आहे.

यावेळी उपआयुक्त संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा