Home क्राइम वॉच ‘रेझिंग डे’ सप्ताहानिमित्त पोलिसांकडून 65 लाखांचा मुद्देमाल तक्रारदाराना परत

‘रेझिंग डे’ सप्ताहानिमित्त पोलिसांकडून 65 लाखांचा मुद्देमाल तक्रारदाराना परत

 

कल्याण दि.7 जनेवारी :
2 ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग सप्ताह साजरा केला जात असून यानिमित्ताने पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या पोलिसांकडून रेझिंग डे सप्ताह पाळण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेला रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहने असा 65 लाखांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आल्या. यामध्ये एटीएममधून चोरी केलेल्या 40 लाखांच्या रक्कमेचाही समावेश होता. आपल्या वस्तू आणि पैसे परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांप्रति समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते हा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला.

यावेळी एसीपी अनिल पोवार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत चव्हाण, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बानकर आदी अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा