मंगळवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेच्या कोपर परिसरात घडला प्रकार
डोंबिवली दि.4 ऑक्टोबर :
डोंबिवली पश्चिमेच्या कोपर परिसरात एका दोन मजली धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रहिवाशांच्या सामानाचे आणि एका गाडीचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
ही धोकादायक इमारत सुमारे 30 ते 35 ३५ वर्षांपूर्वीची आहे. या इमारतीत पाच कुटुंबे राहत होती. या इमारतीची माती पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी दुपारीच हे सर्व कुटुंब इमारतीबाहेर पडली होती. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.
दरम्यान ही इमारत धोकादायक असल्याने पूर्णपणे तोडली जाणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली.