Home ठळक बातम्या …नाहीतर बीएसयूपी इमारतीत घुसून घरं ताब्यात घेऊ – शिवसेना आणि काँग्रेसचा इशारा

…नाहीतर बीएसयूपी इमारतीत घुसून घरं ताब्यात घेऊ – शिवसेना आणि काँग्रेसचा इशारा

 

कल्याण दि.27 सप्टेंबर :
2005 आणि 2010 मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अनेकांची घरं तोडली. या बाधित नागरिकांना शासनाच्या बीएसयूपी योजनेत घरं देण्याचे आश्वासन देऊन 15 वर्षे उलटली तरीही बाधित नागरिकांना घरं मिळाली नसल्याने अखेर आज या नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. बाधित नागरिकांना केडीएमसीकडून लवकरात लवकर ताबा न मिळाल्यास संबंधित इमारतीत घुसून घरांचा ताबा घेण्यात येईल असा इशारा शिवसेना आणि काँग्रेसने केडीएमसीला दिला आहे.

पत्रीपुल ते दुर्गाडी रस्ता रुंदीकरणात अनेक नागरिकांची घरे तुटली. त्यापैकी केडीएमसीकडून 322 लाभार्थी निश्चित करून त्यांना बीएसयूपी घरं देण्याचा निर्णयही केडीएमसीकडून घेण्यात आला. मात्र 15 वर्षे उलटूनही हे बाधित नागरिक या घरांचा ताबा मिळण्यासाठी केडीएमसीचे उंबरठे झिजवत आहेत. त्यानंतरही पदरी निराशाच येत असल्याने आज या नागरिकांनी साखळी उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे शकील खान यांनी सांगितले.
दरम्यान नागरिकांच्या या आंदोलनाला काँग्रेस आणि शिवसेनेनेही पाठींबा दिला असून त्यांनी केडीएमसीच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच घरं मंजूर झालेल्या नागरिकांना केडीएमसीने लवकरात लवकर ताबा दिला नाही तर संबंधित इमारतीत घुसून ताबा घेण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला. त्यावर आता केडीएमसी प्रशासन काय निर्णय घेते हे लवकरच स्पष्ट होईल

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा